Global Banner
Heartfulness Logo

जागतिक ध्यान दिवस

एक विश्व, एक हृदय

जगभरातील लाखो लोक २० मिनिटांच्या मार्गदर्शित हार्टफुलनेस ध्यानासाठी सामील झाले

कार्यक्रम पूर्ण झाला
तुमचा प्रवास सुरू ठेवा

80+

वर्षे परिवर्तनाची

20M+

कोटी पेक्षा जास्त अभ्यासी

160+

देशांत उपस्थिति

मार्गदर्शित ध्यानाचा अनुभव घ्या|यूट्यूबवर निःशुल्क लाइव्ह|जगभरात कुठूनहीं

जागतिक शांतीचा क्षण

Moment ThumbnailPlay Button

याचे महत्त्व

2024 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला. या ऐतिहासिक उपक्रमासाठी भारताला जागतिक भागीदार म्हणून नियुक्त करण्यात आले. 21 डिसेंबरची निवड यासाठी करण्यात आली कारण हा अयन दिन दर्शवतो – जगभरातील नैसर्गिक संक्रमण आणि नूतनीकरणाचा दिवस, जो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे.

21 डिसेंबर 2025 रोजी, जगाच्या कानाकोपऱ्यातून 10 लाखांहून अधिक लोक एकत्रितपणे विराम घेतील. 20 मिनिटांसाठी, दाजींच्या मार्गदर्शनाखाली हार्टफुलनेस ध्यानाद्वारे आपण अंतर्मुख होऊ. जेव्हा हृदये एकाच उद्देशाने एकत्र येतात, तेव्हा काहीतरी गहन घडते.

तुमची उपस्थिती का महत्त्वपूर्ण आहे

संशोधन दर्शवते की एकत्र ध्यान केल्याने अनुभव अधिक प्रबळ होतो. जेव्हा आपण समूहात अभ्यास करतो, तेव्हा वैयक्तिक अनुभव अधिक गहन होतात. सामूहिक संकल्पामुळे मोजता येण्याजोगे सकारात्मक परिणामांचे सृजन होते आणि शांतीची लहर आपल्या समाजात पसरते. तुमचा सहभाग शांतीसाठी तुमचे योगदान आहे.

या जागतिक मेळाव्याचा भाग बना. प्रत्येक खंडात विस्तारलेल्या सामूहिक चेतनेच्या लाटेला तुमच्या संकल्पाची जोड द्या. तुमची उपस्थिती फक्त एक संख्या म्हणून नाही, तर या ऐतिहासिक क्षणाचा स्वागतार्ह सदस्य म्हणून महत्त्वाची आहे.

दाजींचा संदेश

हार्टफुलनेसचे जागतिक आध्यात्मिक नेते दाजी यांनी सर्वांना या क्षणाचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले.

Daaji
Play Button

जेव्हा हृदये एका सामायिक संकल्पाने एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण विश्वाला स्पर्श करणाऱ्या शांतीच्या लहरी आपण निर्माण करतो.

दाजी

हृदये प्रकाशमान होताना पाहा

Meditation Frame 1Meditation Frame 2

0

सामील झालेले हृदय

0

देशांपर्यंत पोहोचले

00:00:00

बाकी वेळ

About Heartfulness

हार्टफुलनेस संबंधी

हार्टफुलनेस अनुभूतीशी संबंधित आहे—आपले जीवन हृदयाच्या प्रेरणांनी मार्गदर्शित होते. हृदयाचा आवाज ऐकून त्यातून मिळणारे आंतरिक मार्गदर्शन आत्मसात करणे आपल्याला जीवनावर प्रभुत्व मिळवण्यास शिकवते. हार्टफुलनेस ध्यान हृदय आणि मनाचा ताळमेळ साधून संतुलन आणि स्पष्टता निर्माण करते.

आमचे उद्दिष्ट आहे हृदय-केंद्रित जीवनशैलीद्वारे मानवी चेतनेचा विकास करणे, जी ऐक्य निर्माण करते आणि जागतिक शांतीला प्रोत्साहन देते.

160+ देशांमध्ये 5,000 पेक्षा अधिक ध्यान केंद्रांद्वारे, आम्ही ध्यान, योग आणि सर्वांगीण उपक्रमांद्वारे लाखो लोकांना आंतरिक परिवर्तन, संतुलन आणि स्वास्थ्य प्राप्त करण्यात मदत करतो.

Google Play StoreApple App Store

हार्टफुलनेस साधना का करावी?

  • तणाव आणि चिंतेची पातळी कमी होते, मानसिक स्पष्टतेत आणि एकाग्रतेत वाढ होते.
  • भावनिक संतुलन, जुळवून घेण्याची क्षमता, संयम आणि सहनशीलता यामध्ये वृद्धी.
  • शारीरिक स्वास्थ्य, झोप, हृदय-आरोग्य इत्यादी गोष्टीत सुधारणा.
  • समानुभूती आणि करुणेच्या क्षमतेत वाढ.
  • उच्च आत्म-जागरूकतेचा विकास.

कार्यक्रमाचा तपशील

Event Image
World Meditation Day Event 2024 @ Heartfulness Global Heritage Center, INDIA

कार्यक्रमाची माहिती :

  • 20 मिनिटे मार्गदर्शित ध्यान
  • अंदाजे 30 मिनिटे
  • संगणक, फोन किंवा टॅबलेटवर यु-ट्युब प्रत्यक्ष प्रसारणाद्वारे कुठूनही सामील व्हा

पूर्वतयारी :

  • एक शांत जागा
  • आरामदायी बसण्याची व्यवस्था
  • हेडफोन्स (ऐच्छिक)
  • खुले हृदय

काय होणार आहे :

  • 5 मिनिटे आधी: तुमची आरामदायक स्थिती निवडा
  • ध्यान करताना: दाजी तुम्हाला टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करतील
  • ध्यानानंतर: काही क्षण शांत बसा आणि तुम्हाला कसे वाटते त्याचे निरीक्षण करा

Decorative flower
The Heartfulness way bookThe Heartfulness way book

द हार्टफुलनेस वे, पुस्तक 2

ध्यानाची गहनता वाढवण्यासाठी आणि हृदयाच्या साहाय्याने जगण्यासाठी एक सौम्य, व्यावहारिक मार्गदर्शक.

पुस्तक प्राप्त करा

जगभरात उपलब्ध · छापील आणि ई-पुस्तक

" फक्त तुम्ही ते अनुभवता हे पुरेसे नाही. ते बाहेरही प्रकट झाले पाहिजे, जेणेकरून इतरांना तुमच्या उपस्थितीत आनंद आणि शांतीचा अनुभव होईल.

— दाजी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होय नक्कीच. जागतिक ध्यान दिवस हा पूर्ण नवोदितांचे स्वागत करण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर दाजी मार्गदर्शन करतील. कोणताही अनुभव किंवा ज्ञान असणे आवश्यक नाही - फक्त प्रयोग करण्याची तयारी ठेवा.

ते अगदी स्वाभाविक आहे आणि त्यात काहीच गैर नाही. हार्टफुलनेस ध्यान म्हणजे पूर्णपणे अचल बसणे नाही. जर तुम्हाला तुमची स्थिती बदलायची असेल किंवा थोडी हालचाल करायची असेल तर ते ठीक आहे. हा अभ्यास सौम्य आणि क्षमाशील आहे.

नाही. हार्टफुलनेस ही एक ध्यान पद्धत आहे, धर्म नाही. सर्व धर्माच्या लोकांना - आणि ज्यांची कोणतीही धार्मिक संलग्नता नाही - अशांना हे त्यांच्या श्रद्धेशी सुसंगत वाटते. तुम्ही अनुसरण करत असलेल्या कोणत्याही आध्यात्मिक किंवा तात्विक मार्गाला पूरक म्हणून त्याची रचना केली आहे.

अनेक नवोदितांना हा प्रश्न पडतो. जर असे घडले तर याचा अर्थ एवढाच होतो की तुमच्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. कालांतराने, तुम्हाला स्वाभाविकपणे विश्रांती आणि सजगता यांच्यात संतुलन आढळेल. ध्यान हा एक अभ्यास आहे, कार्यप्रदर्शन नाही - यात 'अपयश' नाही.

नाही. हे एक यु-ट्युब प्रत्यक्ष प्रसारण आहे जे तुम्ही पाहत आहात. तुम्हाला कोणी पाहत नाही. तुम्हाला पूर्ण गोपनीयता असते.

कार्यक्रमानंतर 48 तास चित्रफीत मुद्रण (रेकॉर्डिंग) उपलब्ध असेल. वास्तविक वेळेत एकत्र ध्यान करण्याच्या प्रत्यक्ष अनुभवाची स्वतःची एक गुणवत्ता असते हे खरे असले तरी, जर तुम्ही नियोजित वेळी आमच्यात सामील होऊ शकत नसाल तर रेकॉर्डिंग सुलभता देते.

बरोबर. नोंदणी मोफत आहे. कार्यक्रम मोफत आहे. सर्व हार्टफुलनेस संसाधने मोफत आहेत. ही जगाला आमची देणगी आहे.

कधीही नाही. आम्ही तुमची माहिती फक्त कार्यक्रमाची अद्यावत माहिती आणि संबंधित हार्टफुलनेस संसाधने पाठवण्यासाठी वापरतो. आम्ही तुमची माहिती कधीही तृतीय पक्षांना विकत नाही किंवा देत नाही.

Meditation Frame 2

आम्ही एकत्र ध्यान केले!

या मोफत ध्यान कार्यक्रमासाठी जगभरातून लोक एकत्र आले होते. विद्यार्थी आणि शिक्षक. आरोग्यसेवा कर्मचारी आणि कलाकार. शांती शोधणारे लोक. अर्थपूर्ण काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे लोक.

या सामायिक अनुभवाचा भाग झाल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.

तुम्ही नोंदणी केल्यावर काय होते:

  • checkboxकार्यक्रमाच्या तपशीलांसह पुष्टीकरण मिळते
  • checkboxयूट्यूब प्रत्यक्ष प्रसारणाची लिंक तुमच्या ईमेलवर पाठवली जाते
  • checkboxकार्यक्रमापूर्वी व्हाट्सअँपद्वारे स्मरणपत्र संदेश मिळतात.
Heartfulness Logo
  • /social/twitter.png
  • /social/facebook.png
  • /social/instagram.png
  • /social/youtube.png

© 2026 हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट · वन मिलियन हार्ट्स मोहीम.